'आशिया चषक स्पर्धे'च्या पहिल्या दोन सामन्यात 'या' दिग्गज खेळाडूला विश्रांती, प्रशिक्षक राहुल द्रविड यांची माहिती

के एल राहुलने फलंदाजी चांगली केली असून यष्ठिमागे देखील चांगला खेळ केला आहे. त्याच्या तंदुरुस्तीत देखील सुरधारणा होत आहे
'आशिया चषक स्पर्धे'च्या पहिल्या दोन सामन्यात 'या' दिग्गज खेळाडूला विश्रांती, प्रशिक्षक राहुल द्रविड यांची माहिती

आज टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेसाठी कोलम्बोसाठी रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला हा पाकिस्तानच्या संघाविरोधात होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतसाठी भारतीय संघ गेल्या सहा दिवसांपासून बंगळुरु येथे सराव करत आहे. दुखापतीतून सावरणारे लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी सराव सत्राच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात होते. तसंच त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, आता क्रिकेट प्रेमींसाठी नाराजीची बातमी समोर आली आहे.

सराव सत्रात चांगली कामगिरी करणारा केळाडू के एल राहुल(KL Rahul) पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याची माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(Rahul Dravid) यांनी दिली आहे. त्यामुळे इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार हे जवळपास पक्क झालं आहे.

के एल राहुलने फलंदाजी देखील चांगली केली असून यष्ठिंमागे देखील चांगला खेळ केला आहे. त्याच्या तंदुरुस्तीत देखील सुरधारणा होत आहे. परंतु वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर असल्याने त्याला लगेच मैदानात उतरवणं धोकादाक ठरेलं, त्यामुळे त्याला पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदरुस्त आहे असलून त्याने दमदार फलंदाजी केली, अशी माहिती राहुल द्रविड यांनी दिली आहे.

सध्या भारतीय संघात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in