आज बॉर्डर गावस्कर मालिकेतील (IND vs AUS) दुसरा कसोटी सामन्याचा पहिला दिवस पार पडला. यावेळी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा २६३ धावांमध्ये आटोपला. यावेळी मोहम्मद शमीचा भेदक मारा आणि जडेजा अश्विनच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून मोहम्मद शमीने ४ तर रविंद्र जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच, ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने ८१ तर पीटर हँड्स्कम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात भारताने नाबाद २१ धावा केल्या. सध्या रोहित शर्मा हा १३ धावांवर तर के एल राहुल हा ४ धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाने पहिले नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सावध सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नरने उस्मान ख्वाजाच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर शमीने डेव्हिड वॉर्नरला १५ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशानेने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने १८ धावांवर त्याला बाद केले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथला देखील शुन्यावर बाद करत अश्विनने ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यानंतर उस्मान ख्वाजा ८१ धावांवर असताना जडेजाने त्याची विकेट काढली.
त्यानंतर पीटर हँड्स्कम्ब सोडला तर एकही फलंदाजाला तग धरता आला नाही. रवींद्र जडेजाने शवजाची विकेट घेताच त्याने कसोटीमध्ये २५० विकेट्स पूर्ण केले. सर्वात वेगात कसोटीमध्ये २५० आणि २५०० धावा करताना तो पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला. तसेच, जगभरातून अशी कामगिरी करणारा तो दुसरा अष्टपैलू ठरला.