IND vs NZ T20 : न्यूझीलंडमधील थंडीच्या कडाक्यातही 'सूर्या' तळपला; तर गोलंदाजांसमोर किवी फलंदाज गार!

न्यूझीलंडमधील (INDvsNZ) माऊंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय
IND vs NZ T20 : न्यूझीलंडमधील थंडीच्या कडाक्यातही 'सूर्या' तळपला; तर गोलंदाजांसमोर किवी फलंदाज गार!

न्यूझीलंडविरुद्ध (INDvsNZ) दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ६५ धावांनी धूळ चरत विजय मिळवला आहे. हा सामना न्यूझीलंडमधील माऊंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला होता. यासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात विशेष योगदान दिले ते म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक हुड्डाने. (Deepak Hudda) सूर्यकुमार हा ४९ चेंडूंमध्ये शतक करत नाबाद राहिला. तर, दीपक हुड्डाने अवघ्या २.५ ओव्हर्समध्ये ४ विकेट घेऊन न्यूझीलंडचे कंबरडे मोडले.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्याने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्याशिवाय इशान किशनने सर्वाधिक ३६ धावा केल्या.

त्यानंतर १९२ धावांचा सामना करताना न्यूझीलंडचा डाव १२६ धावांवर आटोपला. दीपक हुडाने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याचवेळी युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांना २-२ यश मिळाले. न्यूझीलंडकडून कर्णधार विल्यमसनने ५२ चेंडूत ६१ धावा केल्या. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने हार्दिक पंड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याची टी-२० कारकिर्दीतील ही दुसरी हॅट्ट्रिक आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in