भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्यासाठी 'या' देशाची ऑफर

भारत पाकिस्तान मालिकेबाबत भारतामध्ये वादंग होत असताना आता बाहेरच्या देशांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे
भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्यासाठी 'या' देशाची ऑफर

गेली अनेक वर्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेली १५ वर्ष एकही मालिका झालेली नाही. अशामध्ये टी-२० विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याला मिळालेला जगभरातील प्रतिसाद पाहता, मेलबर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) या दोन देशांमधील कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी ऑक्टोबरमध्ये येथे खेळल्या गेलेल्या टी २० विश्वचषक सामन्यातील शानदार यशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात स्वारस्य दाखवले.

स्टुअर्ट फॉक्सने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, "एमसीजीमध्ये सलग तीन कसोटी सामने खेळणे निश्चितच चाहत्यांसाठी एक पर्वणी असेल. स्टेडियम प्रत्येक दिवशी खचाखच भरले जाईल. भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात जे वातावरण होते, असे वातावरण मी एमसीजीमध्ये यापूर्वी पाहिले नव्हते. याबाबत आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आयसीसीशी चर्चा करावी,"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in