भारताने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये : पीसीबी; चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजन प्रकरण

भारताने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. भारताचे खेळाडू पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी आले, तर त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आमची असेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) म्हणणे आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मुुमताझ बलोच यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही सांगितले.
भारताने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये : पीसीबी; चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजन प्रकरण
Published on

नवी दिल्ली : भारताने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. भारताचे खेळाडू पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी आले, तर त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आमची असेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) म्हणणे आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मुुमताझ बलोच यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही सांगितले.

१९ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी २०१७मध्ये इंग्लंडला अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झालेली. त्यामध्ये पाकिस्तानने भारताला नमवून जेतेपद मिळवले. मात्र पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र शासनाने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाकरता दुबईचा पर्यायही सुचवला आहे. त्यासंबंधीचे पत्र बीसीसीआयने रविवारी आयसीसीला दिले होते. आयसीसीने यासंबंधी पीसीबीला कळवले आहे.

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात मालिकासुद्धा झालेली नाही. त्यामुळेच भारतीय संघ तेथे जाण्याची शक्यता कमी आहे.

logo
marathi.freepressjournal.in