भारताचा बांगलादेश दौरा सप्टेंबरमध्ये; तीन वनडे, तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार

सप्टेंबर महिन्यात या मालिका खेळवण्यात येणार आहेत. मात्र बांगलादेशात सध्या हिंदूंवर होणारे हल्ले तसेच तेथील डळमळीत असलेली राजकीय स्थिती पाहता, सद्यस्थितीत भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार का, याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
भारताचा बांगलादेश दौरा सप्टेंबरमध्ये; तीन वनडे, तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार
Published on

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी भारताविरुद्धच्या तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यात या मालिका खेळवण्यात येणार आहेत. मात्र बांगलादेशात सध्या हिंदूंवर होणारे हल्ले तसेच तेथील डळमळीत असलेली राजकीय स्थिती पाहता, सद्यस्थितीत भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार का, याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सादर केलेल्या पत्रकानुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यात १, ३ आणि ६ सप्टेंबर रोजी तीन वनडे सामने खेळवण्यात येतील. तसेच ९, १२ आणि १२ सप्टेंबर रोजी टी-२० सामने होतील. भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये दाखल होईल.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात, भारताने अनिश्चित कालावधीसाठी बांगलादेशचा दौरा पुढे ढकलला होता. त्यानंतर आता एका वर्षांनी या दोन्ही संघांमध्ये सहा सामने खेळवण्यात येणार आहेत. “बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या दोन्ही मंडळांनी तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यास संमती दर्शवली आहे. व्यग्र आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि दोन्ही संघांना जमतील अशा तारखा या मालिकेसाठी ठरवण्यात आल्या आहेत. भारतीय संघाचे सप्टेंबर महिन्यात स्वागत करण्यासाठी बांगलादेश बोर्ड उत्सुक आहे. लवकरच या दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक सादर करण्यात येईल,” असे बीसीसीआयने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in