भारताने (IND vs BAN Test) दुसऱ्या कसोटीमध्ये बांगलादेशवर ३ विकेट्सनी विजय मिळवला. यावेळी आर अश्विन आणि श्रेयस अय्यरने केलेली ७१ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला १०० धावांची गरज होती. पण भारताची अवस्था ४५ वर ४ बाद अशी होती. त्यानंतरही भारताने ३ झटपट विकेट्स गमावत ७४ वर ७ अशी परिस्थिती झाली होती. (WTC 2023)
मात्र, अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. अश्विनने ४२ तर अय्यरने नाबाद २९ धावांची खेळी केली. मेहंदी हसनने ५ विकेट्स घेतल्या तर कर्णधार शकिब उल हसनने २ विकेट्स घेतल्या.
आर अश्विनने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीर सन्मानित करण्यात आले.
भारताच्या या मालिका विजयाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी भरारी घेतली असून अंतिम सामन्यात जाण्याचा अशा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय संघ हा ९९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर, १२० गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.
भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकादेखील ७२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिकेमध्ये भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.