वैभवकडे लक्ष; भारताचे पहिल्या विजयाचे लक्ष्य, इंग्लंडविरुद्ध आज नॉटिंगहॅम येथे तिसरा टी-२० सामना

आयलैंड संघाविरुद्ध नुकताच विश्वविजेत्या भारतीय संघाला टी-२० मालिका गमवावी लागली. यातून सावरण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नसतानाच भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे.
वैभवकडे लक्ष; भारताचे पहिल्या विजयाचे लक्ष्य, इंग्लंडविरुद्ध आज नॉटिंगहॅम येथे तिसरा टी-२० सामना
वैभवकडे लक्ष; भारताचे पहिल्या विजयाचे लक्ष्य, इंग्लंडविरुद्ध आज नॉटिंगहॅम येथे तिसरा टी-२० सामना(Photo-X)
Published on

नॉटिंगहॅम : आयलैंड संघाविरुद्ध नुकताच विश्वविजेत्या भारतीय संघाला टी-२० मालिका गमवावी लागली. यातून सावरण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नसतानाच भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरी लढत शनिवारी नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात येईल. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या लढतीत भारताला पराभव पत्करावा लागला.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र आता सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस आता कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज असून श्रेयस व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी किती यश मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. २०२४मध्ये याच कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीने कोलकाताला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते.

दरम्यान, श्रेयसच्या नेतृत्वात पहिल्याच मालिकेत भारताला आयर्लंडकडून ०-२ असा मालिका पराभव पत्करावा लागला. या मालिकेपासून संजू सॅमसन, इशान किशन व तिलक वर्मा यांची सुमार कामगिरी कायम आहे. त्यामुळे १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देण्यात आली. वैभव १४ धावांवरच बाद झाला. मात्र आता त्याच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

गोलंदाजीतही भारताला सुधारणेला वाव आहे. रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग यांनी अद्याप छाप पाडलेली नाही. वरुण चक्रवर्ती व अक्षर पटेल मात्र चमक दाखवत आहेत. हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराची अनुपस्थिती भारताला जाणवत आहे. वैभवने आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर श्रीलंकेतील तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाकडून खेळताना वैभवने २९ चेंडूत ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारून पुन्हा लक्ष वेधले होते. तो भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

  • वेळ : रात्री १० वाजता

  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in