वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ! 'या' खेळाडूंचा संघात समावेश

अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा उप-कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ! 'या' खेळाडूंचा संघात समावेश

इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावं लागलं. भारताचे प्रमुख फलंदाज या सामन्यात आपला करिश्मा दाखवायला कमी पडले. एकाही फेरीत भारताला आघाडी घेता आली नाही. यामुळे विश्व विजेता व्हायच भारताचं स्वप्न भंगलं. यावरुन अनेकांनी टीम इंडियावर टीका देखील केली आहे. अनेकांनी संघाच्या निवडीपासून ते खेळाडूंच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यात वेस्ट इंडिज येथे २ कसोटी सामने, ३ वन डे तर ५ ट्वेंटी- २० सामन्याची मालिका होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या या मालिकांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून शुक्रवारी वन डे व कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले आहेत. यात यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड यांच्यासह नवदीप सैनी, मुकेश कुमार, यांची देखील कसोटी संघात एन्टी झाली आहे. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यातून जोषात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा उप-कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या वेळी चेतेश्वर पुजाराला मात्र डुच्चू देण्यात आला आहे. तर संजू सॅमन व ऋतुराज हे वन डे संघात परतले आहेत.

भारतीय कसोटी संघात रोहित शर्माकडे कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. तर अजिंक्य रहाणे यांच्यावर उप-कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच बरोबर शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहेत.

भारतीय वन डे संघाची देखील घोषणा आज करण्यात आली आहेत. यात रोहीत शर्मावर कर्णधार पदाची जबादारी असणार आहे. तर संघात शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकर, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, मुकेश कुमार या ताज्या दमाच्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर विराट कोहली, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा यांच्या सारख्या अनुभवी खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in