रणजी खेळाडूंना अतिरिक्त मानधन द्या! गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला

रणजी क्रिकेटमधील खेळाडूंना अतिरिक्त मानधन देण्याची भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडे केली आहे.
रणजी खेळाडूंना अतिरिक्त मानधन द्या! गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला

मुंबई : एकीकडे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने मानधनाची रक्कम वाढवल्यानंतर आता रणजी क्रिकेटपटूंसाठीही अतिरिक्त मानधन देण्याची मागणी पुढे होऊ लागली आहे. त्यासाठी लिटिलमास्टर आणि भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांना पुढाकार घेतला आहे. रणजी क्रिकेटमधील खेळाडूंना अतिरिक्त मानधन देण्याची गावस्कर यांनी बीसीसीआयकडे केली आहे.

“जर रणजी ट्रॉफी फी दुप्पट किंवा तिप्पट केली तर नक्कीच अनेक क्रिकेटपटू रणजी ट्रॉफी खेळतील. खेळाडूंना चांगले मानधन मिळाल्यास ते रणजीबाहेर जाण्याचे प्रमाण कमी असेल. खेळाडूंना देण्यात येणारी रक्कम वेतन नाही तर मानधन म्हणून द्यावी या कल्पनेला माझी सहमती आहे,” असे गावस्कर यांनी सांगितले. सर्वप्रथम भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबतचे मत मांडले होते. ते म्हणाले की, “जर रणजी खेळाडूंना योग्य मोबदला मिळाला तर अलीकडे जेवढे खेळाडू बाहेर पडताना दिसत आहेत, तितके बाहेर पडणार नाहीत. कारण तरुण खेळाडूंना लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये रस निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे.”

सुनील गावस्कर यांनी दोन रणजी सामन्यांमध्ये जास्त अंतर ठेवण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला. याबाबतची मागणी अनेक संघांचे खेळाडू करत आहेत. ते म्हणाले की, “सामन्यानंतर देण्यात आलेल्या तीन दिवसांमध्ये एक दिवस हा प्रवासात अशा परिस्थितीत, फिजिओ ट्रिटमेंट घेण्यासाठी आणि दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे, कदाचित थोडे मोठे अंतर असावे. जेणेकरून खेळाडूला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in