आयपीएलचा संघविस्तार तूर्तास नाही; १२ संघ करण्याबाबत चर्चाही नाही- सैकिया

इंडियन प्रीमियर लीगचा १२ संघांपर्यंत विस्तार करण्याचा कोणताही तातडीचा विचार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या संघविस्ताराबाबत मंडळात औपचारिक किंवा अनौपचारिक स्वरूपात कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आयपीएलचा संघविस्तार तूर्तास नाही; १२ संघ करण्याबाबत चर्चाही नाही- सैकिया
आयपीएलचा संघविस्तार तूर्तास नाही; १२ संघ करण्याबाबत चर्चाही नाही- सैकिया
Published on: 

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा १२ संघांपर्यंत विस्तार करण्याचा कोणताही तातडीचा विचार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या संघविस्ताराबाबत मंडळात औपचारिक किंवा अनौपचारिक स्वरूपात कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक क्रिकेट बाजारपेठेत आयपीएलविषयी मोठी उत्सुकता असली, तरी सध्या संघविस्ताराला कोणताही वाव नसल्याचे सैकिया यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “२०२८ मध्ये आयपीएल १२ संघांची करण्याच्या शक्यतेबाबत आम्ही औपचारिक किंवा अनौपचारिक कोणतीही चर्चा केलेली नाही. सध्याच्या टप्प्यावर हा विषय आमच्या विचाराधीन नाही,

“आमचे लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या आयपीएलवर आहे. ही आयपीएलची २०वी आवृत्ती असेल आणि ती मोठ्या स्वरूपात आयोजित केली जाईल. सध्या आम्ही त्याच तयारीवर लक्ष केंद्रित केले असून त्यापलीकडील कोणत्याही बाबींचा विचार करत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयपीएलच्या संघविस्ताराबाबत माध्यमांमधील वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)