विराटने मोडला रोहित 'हिटमॅन' शर्माचा 'हा' विक्रम

आयपीएल २०२३च्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला असून विराट राहिला नाबाद
विराटने मोडला रोहित 'हिटमॅन' शर्माचा 'हा' विक्रम

आयपीएल २०२३चा पाचवा सामना रविवारी RCB आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने मुंबईचा ८ गडी राखून पराभव केला. शिवाय या मोसमातील पहिला विजयही नोंदवला. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला.

विराट कोहली आता आयपीएलमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू बनला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी कोहलीने तुफानी खेळी केली. विराट कोहलीने 49 चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने १५० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण करण्याची ही २३वी वेळ होती. आतापर्यंत, हा विक्रम भारतासाठी रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने आयपीएलमध्ये १५० अधिकच्या स्ट्राइक रेटने २२ अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत तिसरे नाव महेंद्रसिंग धोनीचे आहे, ज्याने १९ वेळा ही कामगिरी केली आहे, तर सुरेश रैनाने देखील आयपीएलमध्ये १९ शानदार अर्धशतके पूर्ण केली आहेत. 

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात ५० वेळा भारतासाठी ५० हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमधील २२४ सामन्यांच्या २१६ डावांमध्ये ६७०६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तो ३३ वेळा नाबाद राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ५ शतके आणि ४५ अर्धशतके आहेत. इंडियन प्रीमियर लीगमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ११३ धावा आहे. २००८ पासून तो सातत्याने आरसीबी संघाचा भाग आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in