जडेजाच्या फिरकीत कोलकाताची कोंडी

चेपॉक स्टेडियमवरील या लढतीत नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी स्वीकारली. फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सुनील नरिन आणि अंक्रिश रघुवंशी यांनी ५६ धावांची भागीदारी रचली.
जडेजाच्या फिरकीत कोलकाताची कोंडी

चेन्नई : डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने १८ धावांत मिळवलेल्या ३ बळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सला २० षटकांत ९ बाद १३७ धावांत रोखले.

चेपॉक स्टेडियमवरील या लढतीत नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी स्वीकारली. फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सुनील नरिन आणि अंक्रिश रघुवंशी यांनी ५६ धावांची भागीदारी रचली. मात्र जडेजाने प्रथम रघुवंशीला २४ धावांवर, तर नरिनला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर वेंकटेश अय्यरचाही (३) अडसर दूर केला. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ३४ धावा केल्या. आंद्रे रसेल (१०), रिंकू सिंग (९), रमणदीप सिंग (१३) हेसुद्धा अपयशी ठरले. त्यामुळे कोलकाताला १५० धावांचा टप्पाही गाठता आला नाही. तुषार देशपांडेनेसुद्धा तीन गडी टिपले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in