BCCI च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या खेळाडूंना किती मानधन मिळतं? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी नवीन वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे.
Indian Cricket Team
Indian Cricket Team
Published on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी नवीन वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. बीसीआयच्या ए प्लस ग्रेडमध्ये चार खेळाडूंची निवड करण्यात आलीय. रविंद्र जडेजा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला ए प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करण्यात आलं आहे.

ए प्लस ग्रेडच्या सूचीत कोणत्याही प्रकारचा बदल केला गेला नाहीय. ए ग्रेडमध्ये रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, के एल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पांड्याचा सामावेश करण्यात आला आहे. तर ग्रेड बी मध्ये सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांना जागा मिळाली आहे. तर ग्रेड सी मध्ये १५ खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

ग्रेड ए प्लसमध्ये सामील खेळाडू आणि वार्षिक मानधन

१) विराट कोहली - ७ कोटी रुपये

२) रोहित शर्मा - ७ कोटी रुपये

३) जसप्रीत बुमराह - ७ कोटी रुपये

४) रविंद्र जडेजा - ७ कोटी रुपये

ग्रेड ए मध्ये असलेले खेळाडू आणि वार्षिक मानधन

१) रविचंद्रन आश्विन - ५ कोटी रुपये

२) मोहम्मद शमी - ५ कोटी रुपये

३) मोहम्मद सिराज - ५ कोटी रुपये

४) के एल राहुल - ५ कोटी रुपये

५) शुबमन गिल - ५ कोटी रुपये

६) हार्दिक पांड्या - ५ कोटी रुपये

ग्रेड बी मध्ये समाविष्ठ असलेले खेळाडू आणि वार्षिक मानधन

सूर्यकुमार यादव - ३ कोटी रुपये

ऋषभ पंत - ३ कोटी रुपये

कुलदीप यादव - ३ कोटी रुपये

अक्षर पटेल - ३ कोटी रुपये

यशस्वी जैस्वाल - ३ कोटी रुपये

ग्रेड सी मध्ये समाविष्ठ असलेले खेळाडू आणि वार्षिक मानधन

१) रिंकू सिंग - १ कोटी रुपये

२) तिलक वर्मा - १ कोटी रुपये

३) ऋतुराज गायकवाड - १ कोटी रुपये

४) शार्दुल ठाकूर - १ कोटी रुपये

५) शिवम दुबे - १ कोटी रुपये

६) रवि बिष्णोई - १ कोटी रुपये

७) जितेश शर्मा - १ कोटी रुपये

८) वॉशिंगटन सुंदर - १ कोटी रुपये

९) मुकेश कुमार - १ कोटी रुपये

१०) संजू सॅमसन - १ कोटी रुपये

११) अर्शदीप सिंग - १ कोटी रुपये

१२) केएस भरत - १ कोटी रुपये

१३) आवेश खान - १ कोटी रुपये

१४) प्रसिद्ध कृष्णा - १ कोटी रुपये

१५) रजत पाटीदार - १ कोटी रुपये

logo
marathi.freepressjournal.in