द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा; बीसीसीआयचा निर्णय

द्रविड हे कोरोनाग्रस्त झाल्याने भारतीय संघाबरोबर यूएईला जाऊ शकले नाहीत.
द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा; बीसीसीआयचा निर्णय

भारतीय क्रिकेट संघाचे मु‌ख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्याने आता आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाशी व्हीव्हीएस लक्ष्मण हे जोडले गेल्याचे वृत्त आहे. यामुळे टीम इंडियासह रोहित शर्मालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

द्रविड हे कोरोनाग्रस्त झाल्याने भारतीय संघाबरोबर यूएईला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. सध्या झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच संपलेल्या भारताच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत प्रशिक्षक म्हणून लक्ष्मण यांनी काम पाहिले होते. ते हरारेहून दुबईला पाहोचल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, झिम्बाब्वे मालिकेत खेळलेले आणि आशिया कप संघाचा भाग नसलेले खेळाडू भारतात परतले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in