Video Viral : रिश्ता पक्का हुआ...मनू भाकरच्या आईने नीरज चोप्राची भेट घेताच नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची घसरण झाली असून भारताच्या खात्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ ६ पदकं आहेत. यात १ रौप्य तर ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.
Neeraj Chopra and Manu Bhaker Mother
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on

मुंबई : २६ जुलैपासून सुरु झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सांगता ११ ऑगस्ट रोजी झाली. तब्बल ४ वर्षांनी पार पडणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील तब्बल १० हजारहून अधिक खेळाडू सहभागी होत असतात. २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ७ पदकं जिंकण्यात यश आले होते. मात्र यंदा भारताची घसरण झाली असून भारताच्या खात्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ ६ पदकं आहेत. यात १ रौप्य तर ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राला यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर भारताची नेमबाज मनू भाकर हिने यंदा शूटिंगमध्ये भारताला दोन कांस्य पदक जिंकून दिली. दरम्यान, रविवार ११ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकच्या क्लोझिंग सेरेमनीमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Neeraj Chopra and Manu Bhaker Mother
Pro Kabaddi : प्रो कबड्डीच्या ११व्या हंगामासाठी स्वातंत्र्यदिनी लिलाव; पवन सेहरावत, प्रदीप नरवाल रिंगणात उतरणार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात मनुची आई सुमेधा भाकर यांची आणि नीरजची भेट झाली. दोघे एकमेकांशी संवाद साधत होते. यावेळी मनूच्या आईने नीरज चोप्राला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. या व्हिडीओमध्ये दोघेही आनंदात एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी याचा अर्थ वेगळा घेऊन व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांनी व्हिडीओ खाली कमेंट करून लिहिले, "आता या मनू आणि नीरजचं लग्न लावूनच राहणार." एकाने लिहिले, "आई आता मुलीसाठी जावई शोधण्याच्या मिशनवर आहेत". दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, " मला वाटतं यांचं लग्न जमलंय". अजून एका युजरने कमेंट करत म्हटले, "मनुची आई तिच्या लग्नाविषयी नीरज सोबत बोलत आहे". सदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in