पृथ्वीचे दमदार पुनरागमन; वॉर्नर, पंत यांची अर्धशतके

एसीए क्रिकेट स्टेडियमवरील या लढतीत २४ वर्षीय पृथ्वीला यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच संधी देण्यात आली. त्याने ४ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने फटकेबाजी करताना वॉर्नरसह ५७ चेंडूंतच ९३ धावांची सलामी नोंदवली.
पृथ्वीचे दमदार पुनरागमन; वॉर्नर, पंत यांची अर्धशतके

विशाखापट्टणम : मुंबईकर पृथ्वी शॉने २७ चेंडूंत ४३ धावा फटकावताना झोकात पुनरागमन केले. त्याला कर्णधार ऋषभ पंत (३२ चेंडूंत ५१) आणि डेव्हिड वॉर्नर (३५ चेंडूंत ५२) यांच्या अर्धशतकांची सुयोग्य साथ लाभली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्जसमोर २० षटकांत ५ बाद १९१ अशी धावसंख्या उभारली.

एसीए क्रिकेट स्टेडियमवरील या लढतीत २४ वर्षीय पृथ्वीला यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच संधी देण्यात आली. त्याने ४ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने फटकेबाजी करताना वॉर्नरसह ५७ चेंडूंतच ९३ धावांची सलामी नोंदवली. वॉर्नरने ५ चौकार व ३ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. मुस्तफिजूर रहमानने वॉर्नरला बाद करून ही जोडी फोडली. तर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने पृथ्वीचा झेल टिपला. त्यानंतर मिचेल मार्श (१८) स्वस्तात बाद झाला. मात्र पंतने ४ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक साकारून दिल्लीला पावणेदोनशे धावांपलीकडे नेले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in