चेन्नईच्या दुबेचा अर्धशतकी तडाखा

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गुजरातने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या सलामीवीरांनी ३२ चेंडूंतच ६२ धावांची सलामी नोंदवली.
चेन्नईच्या दुबेचा अर्धशतकी तडाखा

चेन्नई : मुंबईकर डावखुरा फलंदाज शिवम दुबेने (२३ चेंडूंत ५१ धावा) मंगळवारी घणाघाती अर्धशतक साकारले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध २० षटकांत ६ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला.

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गुजरातने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या सलामीवीरांनी ३२ चेंडूंतच ६२ धावांची सलामी नोंदवली. रवींद्रने ६ चौकार व ३ षटकारांसह २० चेंडूंतच ४६ धावा फटकावल्या. रशिद खानने त्याला बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे (१२), ऋतुराज (४६) काही षटकांच्या अंतरात बाद झाले. मात्र ३० वर्षीय दुबेने आयपीएल कारकीर्दीतील सातवे अर्धशतक साकारून चेन्नईला २०० धावांपलीकडे नेले. दुबेने २ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर समीर रिझवी (६ चेंडूंत १४) व डॅरेल मिचेल (नाबाद २४) यांनीही उपयुक्त योगदान दिले.

logo
marathi.freepressjournal.in