क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर ; महाराष्ट्रातील 'या' दोन मैदानांवर होणार तब्बल १० सामने

आयसीसीकडून भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर ; महाराष्ट्रातील 'या' दोन मैदानांवर होणार तब्बल १० सामने

क्रिकेट प्रेमी आतूरतेने वाट बघत असलेल्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीने भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केलं असून ऑक्टोबर महिन्यापासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी पहिला तर १६ नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. या दुर्नामेंटमधील १० सामने हे महाराष्ट्रात खेळवले जाणार असून यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या मैदानांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे येथील मैदानावर हे दहा सामने खेळवले जाणार आहेत. यात मुंबईतील वानखेडे मैदानावर उपांत्य फेरीचा सामाना रंगणार आहे.

यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकातील दहा सामने हे मुंबई आणि पुणे येथील मैदानावर खेळवले जाणार आहे. यातील ९ सामने हे साखळी फेरीतील आहेत. तर एक सामना उपांत्य फेरीचा आहे. महाराष्ट्रात भारतीय संघाचे दोन साखळी सामने होणार आहेत. पुण्यात १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरोधात तर मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर क्वालिफायर टीम विरोधात भारतीय संघ भिडणार आहेत. भारत उपांत्य फेरीत दाखल झाला तर मुंबई सामना होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात होणारे 10 सामने हे मुंबईतील 'वानखेडे' तर पुण्यातील 'गुहंजे' या मैदानावर खेळवले जाणार आहेत.

या विश्वचषकातील पहिला आणि अखेरचा सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममवर रंगणार आहे. ५ ऑक्टोंबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याता लढतीने या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर १९ नोव्हेंबर रोजी होणारा अंतिम सामना देखील याच मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मुंबई आणि कोलकाता येथील मैदानांवर सेमी फायनलचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ सेमिफायनल मध्ये पोहचल्यास मुंबईत सामना होणार आहे. भारतातील १२ मैदानांवर विश्वचषकातील सामने संगणार आहेत. यात गुवाहाटी, त्रिवेन्द्रम, लखनऊ, धर्मशाळा, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथील मैदानांचा यात समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in