अधिकाधिक सराव सामने आयोजित करा; राहुल द्रविडचा बीसीसीआयला सल्ला

आशिया चषक स्पर्धेमधील पराभवामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अधिकाधिक सराव सामने आयोजित करा; राहुल द्रविडचा बीसीसीआयला सल्ला

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी करण्यास करावेत, असा सल्ला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिध्द केले आहे. टी-२० वर्ल्डकप २०२२ची सुरुवात १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार असल्याने या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

आशिया चषक स्पर्धेमधील पराभवामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने द्रविड यांच्या चिंतेत भर पडली आहे. टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाच्या तयारीसाठी मास्टर प्लान तयार केल्यानंतर द्रविड यांनी बीसीसीआयसमोर दोन मागण्या ठेवल्या आहे.

प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार द्रविड यांनी बीसीसीआयला टी-२० विश्वचषकापूर्वी अधिक सराव सामने आयोजित करण्याबरोबरच ऑस्ट्रेलियातील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी संघ नियोजित वेळेच्या एक आठवडाआधी ऑस्ट्रेलियाला पोहोचेल, अशी अवस्था करावी, असेही सुचविले आहे.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतरच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सपोर्ट स्टाफसह टी-२० वर्ल्डकपचा संपूर्ण संघ ५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, “आम्ही अन्य काही संघांशी चर्चा करत आहोत. आयसीसीने आयोजित केलेल्या सराव सामन्यांव्यतिरिक्त हे संघ सराव सामने खेळतील.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाला १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी दोन सराव सामने खेळायचे आहेत. १७ ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे, तर १८ ऑक्टोबरला भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in