भारताची पैलवान विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. आज पार पडलेल्या सामन्यात विनेश फोगाटने तब्बल ४ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकी हिला ३-२ अशा फरकाने पराभूत केले आहे. विनेशने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन पैलवानाला मात देऊन पदक मिळवण्याच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकलं आहे.
मंगळवारी महिला पैलवानांच्या ५० किलो वजनी गटाचा सामना पार पडला. या सामन्यात भारताची पैलवान विनेश फोगाट हिचा सामना जपानची युई सुसाकी हिच्या सोबत होता. जपानची पैलवान युई सुसाकी हीने तब्बल ४ वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब पटकावला आहे. सामन्यात विनेश आणि युई सुसाकी हिची लढत तुफान होणार अशी अपेक्षा सर्वांनाच होती. त्यानुसार विनेशने धमाकेदार सुरुवात करून पहिल्या राउंडमध्ये ४-० अशी आघाडी घेतली होती.
विनेश विजयाच्या जवळ असताना ओसाकाने सुद्धा पॉईंट्स मिळवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिने सुद्धा ४ पॉईंट्स कमावले. त्यानंतर विनेशला एक पॉईंट मिळवता आला आणि त्यामुळे विनेशने ५-४ अशी आघाडी घेतली. अवघ्या एका पॉईंटची आघाडी असल्याने हा सामना कोणीही जिंकू शकत होते. त्याचवेळी विनेशने काही सेकंदात अजून दोन पॉईंट्स मिळवून ७-५ या फरकाने सामना जिंकला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकीचा पराभव केल्यावर विनेशचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने सामना जिंकल्यावर सेलिब्रेशन केलं. यावेळी तिला अश्रू सुद्धा अनावर झाले.