'ज्युनिअर दि वॉल'ला मिळाली मोठी संधी; या संघाचा झाला कर्णधार

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मुलानेही टाकले वडिलांच्या पावलावर पाऊल
'ज्युनिअर दि वॉल'ला मिळाली मोठी संधी; या संघाचा झाला कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविडने क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. त्याला कर्नाटकच्या १४ वर्षांखालील संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो कर्नाटकची ज्युनिअर संघाकडून क्रिकेट खेळतो. वडिलांप्रमाणेच अनेकदा त्याने फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. अन्वय हा राहुल द्रविडचा धाकटा मुलगा आहे. राहुल द्रविडचा थोरला मुलगा समितदेखील कर्नाटकाकडून क्रिकेट खेळतो.

अन्वयने त्याच्या फलंदाजीने अनेकदा चांगली कामगिरी करत बक्षिसे जिंकली आहेत. तसेच, तो यष्टिरक्षकही आहे. त्याला १४ वर्षांखालील इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये कर्नाटक संघाचा कर्णधार बनवण्यात आले. विशेष म्हणजे, २ वर्षांपूर्वी अन्वयने त्याचा मोठा भाऊ समितसह धडाकेबाज खेळी केली होती. या सामन्यामध्ये त्यांनी द्विशतकी भागीदारी केली होती. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणाऱ्या अन्वयने त्यावेळी ९० धावा केल्या होत्या. दोन्ही भावांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या शाळेला स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली होती. त्यामुळे आता वडिलांप्रमाणेच त्याच्या दोनही मुलांकडे क्रिकेटमध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून पाहू लागले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in