विजय दिल्ली कॅपिटल्सचा; चर्चा धोनीच्या फटकेबाजीची

प्रथम फलंदाजी करताना मुंबईकर पृथ्वी शॉने (२७ चेंडूंत ४३ धावा) केलेल्या दमदार सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर (३५ चेंडूंत ५२) आणि पंत (३२ चेंडूंत ५१) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ५ बाद १९१ अशी धावसंख्या रचली.
विजय दिल्ली कॅपिटल्सचा; चर्चा धोनीच्या फटकेबाजीची

विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला २० धावांनी नमवून हंगामातील पहिला विजय नोंदवला. मात्र या लढतीत प्रामुख्याने चेन्नईचा माजी कर्णधार तसेच भारताचा तारांकित माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीचीच चर्चा रंगली होती. धोनीने १६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ३७ धावांसह चाहत्यांची मने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईकर पृथ्वी शॉने (२७ चेंडूंत ४३ धावा) केलेल्या दमदार सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर (३५ चेंडूंत ५२) आणि पंत (३२ चेंडूंत ५१) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ५ बाद १९१ अशी धावसंख्या रचली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (१) आणि रचिन रवींद्र (२) यावेळी अपयशी ठरले. मात्र अजिंक्य रहाणे (४५) आणि डॅरेल मिचेल (३४) यांनी चेन्नईकडून प्रतिकार केला. अखेर या दोघांसह समीर रिझवी शून्यावर बाद झाल्यावर धोनीचे यंदाच्या हंगामात प्रथमच फलंदाजीसाठी आगमन झाले.

लांब केसातील धोनीने २००५मध्ये तो कव्हर्सच्या दिशेने जसे फटके मारायचा, तसेच काही फटके या लढतीतही मारले. त्याला रवींद्र जडेजाने (नाबाद २१) साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७१ धावांत रोखण्यात दिल्लीला यश आले. चेन्नईचा या हंगामातील पहिलाच पराभव ठरला. ४ षटकांत २१ धावा देत ऋतुराज व रचिनला बाद करणारा खलिल अहमद सामनावीर ठरला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in