Rohit Sharma : रोहितला सांगा, आता घरी बस; माजी भारतीय क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

भारतीय संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघातील समावेशावर चर्चा सुरु झाल्या
Rohit Sharma : रोहितला सांगा, आता घरी बस; माजी भारतीय क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ
Published on

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकत २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अंगठ्याला दुखापत झाल्याने या सामन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व हे के. एल. राहुलने (K L Rahul) केले. तसेच, सलामीची जबाबदारी शुभमन गिलने यशस्वीरीत्या पार पाडली. मीरपूर येथे येत्या २२ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या कसोटी संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासंदर्भात 'रोहित शर्माला आता घरीच बसायला सांगा' असा सल्ला प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने दिला आहे.

अजय जडेजा याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाला की, "रोहित शर्मा जर दुसऱ्या कसोटीमध्ये खेळणार असेल तर शुभमन गिलला बाहेर बसावे लागले. पण, त्याने पहिल्या कसोटीत शतकी खेळी केली आहे. तसेच, पुजारानेदेखील शतकी खेळाची केली. त्यामुळे हा प्रश्न खूपच अवघड झाला आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या हाताला दुखापत होते, तेव्हा तो १० दिवस फलंदाजीसाठी उतरू शकत नाही. तुम्ही बरे झालात तरीही लगेच तुम्हाला संघात घेता येऊ शकत नाही. अशामध्ये रोहितची ट्रीटमेंट सुरु आहे. दुखापत कितपत गंभीर आहे, हे सुद्धा आपल्याला माहित नाही. म्हणून मी रोहितला घरीच बसायचा सल्ला देतो आहे,"

बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर रोहितने पहिल्या कसोटीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु, आता दुसऱ्या कसोटीमध्ये तो खेळणार असलायच्या चर्चा आहेत. पण, त्याला संघात जागा मिळावी म्हणून कोणाला संघातून बाहेर पडावे लागणार? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, पहिल्या कसोटीमध्ये सलामीला शुभमन गिलने तर मधल्या फळीत चेतेश्वर पुजाऱ्याने उत्तम कामगिरी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in