सचिन वर्ल्डकपच्या ब्रँड ॲॅम्बेसिडरपदी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे.
सचिन वर्ल्डकपच्या ब्रँड ॲॅम्बेसिडरपदी

नवी दिल्ली : वनडे वर्ल्डकपला सुरुवात होण्यासाठी आता फक्त दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या कमी वेळेत आयसीसीने भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक राजदूत म्हणून घोषित केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. सचिन हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उद्घाटन सामन्यापूर्वी विश्वचषक ट्रॉफीसह बाहेर पडेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले, असे घोषित करेल. भारतात जेव्हा प्रथम वर्ल्डकप झाला त्यावेळी १९८७ साली मी बॉल बॉय होतो, पण त्यानंतर मी सहा वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकलो. वर्ल्डकपचे माझ्या मनात नेहमीच एक वेगळे स्थान आहे. २०११ साली भारताने वर्ल्डकप जिंकला आणि हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे, असे तो म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in