
भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या दुखापतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लंडनमध्ये त्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पण, तो लवकर मैदानावर दिसेल याची शक्यता फार कमी असून जुन्म्धज्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो खेळताना दिसणार नाही. पण, २०२४मध्ये होणाऱ्या विश्वचषक सामन्याआधी तो पूर्णपणे फिट होऊ शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये श्रेयस अय्यरने मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. पण, पाठदुखीचा कारणास्तव त्याला भारतीय संघातून बाहेर पडावे लागले. आयपीएल २०२३मधूनही त्याने माघार घेतली होती. मात्र, इंग्लंडमध्ये त्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून तो लवकरच भारतात परतणार आहे. पण, त्याला काही दिवसांचा आराम सांगितला असून तो काही महिने मैदानात खेळताना दिसणार नाही. भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीचे ग्रहण लागले आहे. कारण, श्रेयस अय्यरशिवाय ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीने ग्रस्त आहेत.