म्हणून माजी क्रिकेटपटूंनी पिळले बीसीसीआयचे कान

पाऊस आल्यास स्टेडियम आच्छादित होऊ शकणारी मैदाने उभारण्याची सूचना जोर धरत आहे
म्हणून माजी क्रिकेटपटूंनी पिळले बीसीसीआयचे कान

भारत आणि दक्षिण यांच्यातील पाचव्या आणि टी-२० सामन्याला पावसामुळे रद्द करावे लागल्याने प्रेक्षकांबरोबरच माजी क्रिकेटपटूंनीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कान पिळले असून स्टेडियमच्या देखभालीतही मोठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देत काही मोलाच्या सूचनाही केल्या आहेत.

पाऊस आल्यास स्टेडियम आच्छादित होऊ शकणारी मैदाने उभारण्याची सूचना जोर धरत आहे. बीसीसीआयने स्टेडियम्सवर यासाठी खर्च करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. जर हे स्टेडियम आच्छादित असले असते तर हा सामना रद्द करण्याची वेळच आली नसती, असे बोलले जात आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि त्यामुएळ चाहत्यांचा हिरमोड झाला. पण जर बीसीसीआयने जर एकच गोष्ट केली असती तर हा सामना रद्द झाला नसता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जर बीसीसीआयने येत्या काही दिवसांमध्ये जर ही एकच गोष्ट केली तर यापुढील सामना रद्द होणार नाहीत, असे बोलले जात आहे.

बंगळुरूमधील पाचव्या सामन्यापूर्वी मालिका २-२ अशी बरोबरीत होती. पाचव्या सामन्यात केवळ ३.३ षटकांचाच खेळ झाला. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना तिकिटाचे निम्मे पैसे देणार असल्याचे जाहीर केले असले, तरी चाहत्यांना खेळांच्या आनंदापासून रोखणे योग्य नव्हते, अशा भावना माजी क्रिकेटपटूंकडून व्यक्त होत आहेत.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सांगितले की, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सांगितले की, बीसीसीआयने स्टेडियम आच्छादित करण्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यांनी किमान काही स्टेडियम्समध्ये यासाठी गुंतवणूक करावी.

ते म्हणाले की, बीसीसीआयने प्रक्षेपणाचे हक्क विकून मोठ्या प्रमाणावर कमाई केली आहे. या परिस्थितीत स्टेडियम आच्छादित करण्यावर पैसा खर्च करण्यात अडचण नाही. प्रतिकूल हवामानाचा सामन्यावर कोणताही परिणाम कसा होणार नाही, याकडे बोर्डाने आवर्जून लक्ष द्यायला हवे.

इंग्लंडच्या केविन पीटरसन यांनीही चोप्रा यांच्या सूरात सूर मिसळत सांगितले की, स्टेडियम्स प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी सुखकारक कशी होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या माध्यम हक्काच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा यासाठी उपयोग होणेही जरूरीचे आहे. पीटरसन म्हणाले की, आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क खूप मोठ्या प्रमाणावर विकले गेले आहेत. ही रक्कम पाहिल्यावर प्रेक्षक, खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड स्टेडियम्समध्ये अधिक चांगल्या सुविधा देईल, अशीच अपेक्षा करणे यात काही गैर नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in