भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका उद्यापासून म्हणजेच १८ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र सामन्यांना अवघा एक दिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyar) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने अधिकृत ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी रजत पाटीदार यांना संधी देण्यात आली आहे.