Suryakumar Yadav ; सूर्याच्या या कृतीने फॅन्स खुश ; एकदा व्हिडिओ पाहाच

या सामन्यासाठी टीम इंडिया केरळला पोहोचली तेव्हा सूर्यकुमार यादवने एका कृतीने तमाम केरळ चाहत्यांची मने जिंकली
India vs SA: WATCH! SKY shows picture of Sanju Samson from team bus in Kerala as crowd chants local hero's name
India vs SA: WATCH! SKY shows picture of Sanju Samson from team bus in Kerala as crowd chants local hero's name

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या २-१ अशा विजयानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपली कमाल दाखवायला तयार आहेत. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ केरळमध्ये दाखल झाला आहे. पहिला सामना केरळमधील तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया केरळला पोहोचली तेव्हा सूर्यकुमार यादवने एका कृतीने तमाम केरळ चाहत्यांची मने जिंकली. टीम इंडियाची बस विमानतळावरून हॉटेलच्या दिशेने निघाली तेव्हा केरळचे चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी उभे होते, तेव्हा सूर्याने चाहत्यांना त्याच्या फोनवर संजूचा फोटो दाखवून प्रतिक्रिया दिली. त्याच्या या कृतीने चाहतेही खूप खूश झाले होते. 

संजू राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असल्याने त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. संजू सॅमसन मूळचा केरळचा असल्यामुळे तिथे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केरळमध्ये पहिला सामना खेळणार आहे, मात्र संजू संघात नसल्याने चाहते काहीसे नाराज आहेत. यामध्ये सूर्याने चाहत्यांना त्याचा फोटो दाखवत संजूची आठवण केल्याने चाहते काहीसे खुश झाल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in