टी-२० मुंबई लीग : दुबेचा दणका; आर्क्स अंधेरीची प्रथमच अंतिम फेरीत धडक

कर्णधार शिवम दुबेच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर आर्क्स अंधेरी संघाने टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक दिली.
टी-२० मुंबई लीग : दुबेचा दणका; आर्क्स अंधेरीची प्रथमच अंतिम फेरीत धडक
टी-२० मुंबई लीग : दुबेचा दणका; आर्क्स अंधेरीची प्रथमच अंतिम फेरीत धडक(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : कर्णधार शिवम दुबेच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर आर्क्स अंधेरी संघाने टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक दिली. आर्क्स अंधेरीने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्सचा पाच गडी राखून पराभव केला.

शिस्तबद्ध गोलंदाजी करत टायगर्सला ७ बाद १५० धावसंख्येवर रोखल्यानंतर अंधेरीला विजयाचा पाठलाग करताना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र दुबेच्या आक्रमक फलंदाजीने त्यांना नऊ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंधेरीला सुरुवातीलाच धक्का बसला. सलामीवीर मुशीर खान शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर दिव्यांश सक्सेना आणि अर्जुन तेंडुलकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करत डाव सावरला.

टी-२० मुंबई लीग : दुबेचा दणका; आर्क्स अंधेरीची प्रथमच अंतिम फेरीत धडक
रहाणेच्या नेतृत्वात पँथर्सची विजयी सलामी; सूर्यकुमारच्या ट्रायम्फ नाइट्स संघाचा पराभव; हार्दिक, आयुष यांची चमकदार कामगिरी

मात्र, शम्स मुलानीने दोन बळी घेत सामन्याचे पारडे पुन्हा टायगर्सच्या बाजूने झुकवले. त्याने आधी तेंडुलकरला (१३) आणि नंतर सेट झालेल्या सक्सेनाला बाद केले. सक्सेनाने १६ चेंडूंत ३४ धावांची वेगवान खेळी केली, ज्यामध्ये सहा चौकार, एका षटकाराचा समावेश होता.

प्रसाद पवार (२६) आणि प्रग्नेश कानपिल्लेवार (१८) यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत विजयाचा पाठलाग पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. अंधेरीचा सामना नियंत्रणात येत आहे असे वाटत असतानाच, अजित यादवने १३व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद केले आणि अंधेरीची अवस्था ५ बाद ९२ धावा अशी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in