भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सीएसके आणि धोनीला तंबी

जोहान्सबर्ग सुपर किंग्ज’ या संघाकडून पूर्वाश्रमीचा सीएसके स्टार फाफ ड्यू प्लेसिस खेळणार आहे
 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सीएसके आणि धोनीला तंबी

चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) दक्षिण आफ्रिकेतील नव्या टी-२० लीगमध्ये ‘जोहान्सबर्ग सुपर किंग्ज’ नावाने संघ खरेदी केल्यानंतर सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी या स्पर्धेत मेन्टॉरच्या भूमिकेत राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मुद्द्यावर सीएसके आणि धोनीला तंबी दिल्याचे वृत्त आहे.

‘जोहान्सबर्ग सुपर किंग्ज’ या संघाकडून पूर्वाश्रमीचा सीएसके स्टार फाफ ड्यू प्लेसिस खेळणार आहे. धोनीदेखील जोहान्सबर्ग किंग्जमध्ये दिसणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जर धोनीला दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल तर आधी आयपीएलशी नाते तोडावे लागेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, कोणताही भारतीय खेळाडू सगळ्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त झाल्याशिवाय विदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही हे स्पष्ट आहे.

जर एखाद्या खेळाडूला विदेशी टी-२० लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्याला बीसीसीआयशी सर्व संबंध तोडावे लागतील.

बीसीसीआयचे विदेशी टी-२० लीग खेळण्याबाबत नियम स्पष्ट आहेत. बीसीसीआयची भारतीय खेळाडूंना विदेशातील टी-२० लीग खेळण्याची परवानगी नाही. एखादा भारतीय खेळाडू सीपीएल, बीबीएलसारख्या लीगमध्ये खेळू इच्छित असेल, तर त्या खेळाडूला आधी आयपीएलसह सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त व्हावे लागेल. अनेक खेळाडूंनी हा नियम बदलण्यासाठी आवाज उठविला आहे. आयपीएल संघांनी यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधील संघ विकत घेतले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in