भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर फेल; ११७ धावांत भारतीय संघ सर्वबाद

आज विशाखापट्टणममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिशेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्यासमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत
भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर फेल; ११७ धावांत भारतीय संघ सर्वबाद
Published on

आज ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना हा विशाखापट्टणम येथे सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. संपूर्ण संघ हा अवघ्या ११७ धावांमध्ये सर्वबाद झाला. यावेळी एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर अक्षर पटेलने त्यांनंतर २९ धाव केल्या. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेत अर्धा संघ तंबूत पाठवला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मिशेल स्टार्कने रोहित शर्मा (१३), शुभमन गिल (०), सूर्यकुमार यादव (०) आणि के.एल.राहुल (९) यांना बाद करत ४८ धावांमध्ये ४ बाद अशी अवस्था केली. हार्दिक पांड्याही स्वस्तात तंबूत परतला. ४९ धावांवर निम्मा संघ हा तंबूत परतला होता. एकीकडे विराट कोहली डाव सावरत असतानाच एलिसने त्याची विकेट घेतली आणि भारतीयांचा आशा संपुष्ठात आल्या. यावेळी मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेतल्या, तर शॉन अबॉटने ३ आणि नॅथन एलिसने २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांकडून हा सामना जिंकून मालिका विजय मिळवून देण्याची अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमींनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in