दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० विकेट्सने विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल १० विकेट्सने विजय मिळवला
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० विकेट्सने विजय
@ICC

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ११८ धावांचे आव्हान ठेवले होते. असे असताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धडाकेबाज फलंदाजी करत हे लक्ष अवघ्या ११ षटकांमध्ये पार केले. यावेळी मार्शने 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर त्याला ट्रॅव्हिसनेही अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता दुसरा सामना १० विकेट्सने जिंकला. याचसोबत आता १ - १ अशी मालिकेत बरोबरी केली आहे.

आज ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना हा विशाखापट्टणम येथे झाला. यावेळी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. संपूर्ण संघ हा अवघ्या ११७ धावांमध्ये सर्वबाद झाला. यावेळी एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर अक्षर पटेलने त्यांनंतर २९ धाव केल्या. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेत अर्धा संघ तंबूत पाठवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in