भारतीय संघासाठी मानसिक कंडिशनिंग तज्ज्ञ म्हणून 'या' खास व्यक्तीची निवड

काहीवेळा खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होते किंवा काही खेळाडू निराश होतात आणि त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत असतो
 भारतीय संघासाठी मानसिक कंडिशनिंग तज्ज्ञ म्हणून 'या' खास व्यक्तीची निवड

भारताला २०११ मध्ये विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅडी अप्टन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघासाठी मानसिक कंडिशनिंग तज्ज्ञ म्हणून निवड केली आहे. टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून बीसीसीआयने बऱ्याच कालावधीनंतर या खास व्यक्तीला भारतीय संघात स्थान दिले आहे.

काहीवेळा खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होते किंवा काही खेळाडू निराश होतात आणि त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त करण्यासाठी अप्टन यांची निवड बीसीसीआयने केली आहे. अप्टन हे वेस्ट इंडिजबरोबरच्या टी-२० मालिकेपासून भारतीय संघाबरोबर असतील, हे आता बीसीसीआने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी यावेळी सांगितले की, “संघ व्यवस्थापनाला वाटले की, पॅडीचा अनुभव खेळाडूंना मदत करेल आणि म्हणूनच बीसीसीआयने त्याची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अप्टन यांनी भारतीय संघाबरोबर काम केले आहे आणि त्याचा चांगला अनुभव भारतीय खेळाडूंना आला आहे. त्यामुळे आता टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून त्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांतच अप्टन हे भारतीय संघाशी जोडले जाणार आहेत.”

भारताने २०१३ नंतर एकही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे द्रविड यांनी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल होत असून विश्वचषकासाठी संघाची बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळेच द्रविड यांनी येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी पर्याय शोधलेला आहे. कर्णधारासाठीही त्यांनी बरेच पर्याय शोधलेले आहेत. त्याचबरोबर आता संघात अप्टन यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in