नव्या संघबांधणीची मुहूर्तमेढ! वाचा दिग्गज खेळाडूंनी काय सुचवले

पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०२४मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आतापासूनच भारताने पाऊल उचलावे
नव्या संघबांधणीची मुहूर्तमेढ! वाचा दिग्गज खेळाडूंनी काय सुचवले

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १५ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक उंचावण्याचे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. या मानहानीनंतर आता भारतीय संघात बदलाचे वारे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या तसेच परदेशातील माजी क्रिकेटपटूंनीही भारतीय संघाला टी-२० क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासह नव्याने संघबांधणी करण्याचे सुचवले आहे. पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०२४मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आतापासूनच भारताने पाऊल उचलावे, असा एकच सूर चाहतेही प्रकट करत आहेत.

हार्दिक पंड्याने गेल्या काही महिन्यांत स्वत:ला सातत्याने सिद्ध केले आहे. भारताने २०२४च्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता हार्दिककडे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवावे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेपासूनच भारताने संघबांधणीस प्रारंभ करावा, असे स्पष्ट मत भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले.

कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताने पूर्णत: दोन वेगळे संघ खेळवावेत, असे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने सुचवले आहे. इंग्लंडने टी-२० आणि एकदिवसीय प्रकारात गाजवलेल्या वर्चस्वानंतर सध्या सगळीकडे त्यांच्या संघबांधणीचे कौतुक होत असून कुंबळेनेसुद्धा भारताला त्याचे अनुकरण करण्याचे सांगितले आहे. “टी-२० प्रकारात अनुभव महत्त्वाचा ठरेलच असे नाही. टी-२०मुळे एकदिवसीय क्रिकेटही वेगवान झाले असून येथेही चेंडूपेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज तसेच यॉर्कर, बाऊन्सर चेंडूंचा सातत्याने मारा करणारे गोलंदाज गरजेचे आहेत. त्यामुळे अष्टपैलूंचे महत्त्व वाढले आहे. कसोटीमध्ये मात्र तुम्ही परंपरेप्रमाणे विशेषज्ञ फलंदाज अथवा गोलंदाजांना संधी देऊ शकता. अशा स्थितीत दोन वेगळे संघ तयार करणे काळाची गरज आहे,” असे कुंबळे म्हणाला.

भारताची विश्वचषकातील कामगिरी पाहता रोहित, कार्तिक, अश्विन या खेळाडूंना संघ व्यवस्थापन त्यांच्या पुढील वाटचालीविषयी नक्कीच विचारतील, अशी आशा आहे. युवा खेळाडूंना संधी देण्याची गरज असून भारताने त्यासाठी आतापासूनच पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे,” असे पानेसर म्हणाला.

राहुल द्रविडला फक्त एकदिवसीय आणि कसोटी प्रकारासाठी प्रशिक्षकपदी कायम ठेवून त्याला सहाय्यक म्हणून आशिष नेहराकडे टी-२० संघाचे प्रशिक्षकपद सोपवता यावे, असे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने सुचवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in