नोकरी सोडून पठ्ठ्या पोहोचला थेट विराट कोहलीच्या दारी; पण...पाहा व्हिडिओ

विराट कोहलीसारख्या स्टार क्रिकेटरला भेटण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. पण, या वेळी एका चाहत्याने जे केलं, ते थोडं धाडसीच म्हणावं लागेल! सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका युवकाने नोकरी सोडून थेट कोहलीच्या घरासमोर हजेरी लावलीय.
नोकरी सोडून पठ्ठ्या पोहोचला थेट विराट कोहलीच्या दारी; पण...पाहा व्हिडिओ
Published on

आपल्या आवडत्या खेळाडूला प्रत्यक्ष पाहणं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढणं हे अनेक चाहत्यांचं स्वप्न असतं. विराट कोहलीसारख्या स्टार क्रिकेटरला भेटण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. पण, या वेळी एका चाहत्याने जे केलं, ते थोडं धाडसीच म्हणावं लागेल! सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका युवकाने नोकरी सोडून थेट कोहलीच्या घरासमोर हजेरी लावलीय.

या व्हिडिओमध्ये विराट दिल्लीतील घरी असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक युवक विराट कोहलीची भेट न झाल्याने त्याच्यासमोर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. चाहता विराटला म्हणतोय, "मी कधीपासून बोलतोय. फोटो काढत नाहीये. मी नोकरी सोडून आलोय...तर किमान फॅनसोबत एक फोटो तर काढू शकतो ना?'' परंतु, विराट त्याच्यासोबत फोटो काढत नसल्याने चाहता चांगलाच नाराज झालेला दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

अनेकांनी या प्रसंगावर प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी विराट कोहलीचं समर्थन केलं आहे. नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे, की विराटने तुला जॉब सोडायला सांगितलं होतं का? खेळाडूंच्या सुरक्षेचा आणि प्रायव्हसीचा देखील प्रश्न आहे.

हा गंमतीशीर व्हिडिओ काही सेकंदांचा असला तरी, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in