
मुंबई : भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्व साखळी सामन्यांची तिकिटे १०० रुपयांपासून सुरू होणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी याविषयी घोषणा करतानाच तिकीट विक्रीला प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. आयसीसीच्या संकेतस्थळावर चाहते तिकिटे चुक करू शकतात.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांचा विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेतसुद्धा होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोल होतील, या विश्वचषकासाठी आता २५ दिवसांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असून एकाना अन्य सर्व स्टेडियमची तयारी पूर्ण झालेली आहे.
भारतातील नवी मुंबई, गुवाहाटी, इंदूर आणि विशाखापट्टणम येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत, तर श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमचे यजमानपदाचे हक्क हिरावून घेत नवी मुंचाईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला देण्यात आले. नव्या वेळापत्रकानुसार डी. वाय. पाटीलवर भारताचे अनुक्रमे २३ व २६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड व बांगलादेशशी सामने होतील. तसेच २० तारखेला श्रीलंका-बांगलादेश लडत येथे होईल. मग ३० ऑक्टोबरला दुसरा उपांत्य सामना, तर २ नीखीबरला अंतिम सामना नवी मुंबईत होईल. जर पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली, तरच हा सामना कोलंबोत खेळवण्यात वेईल.
चेंगराचेंगरी झाल्यापासून बंगळुरूतील सुरक्षेचा प्रश्न निर्माण५ झाला होता. त्यामुळे बीसीसीआय व आयसीसी अन्य ठिकाणाच्या शोधात होते. म्हणूनच नवी मुंचाईला पसंती देण्यात आली.
उद्घाटन सोहळ्याला श्रेयाची उपस्थिती
लोकप्रिया गायिका श्रेया घोषाळ विश्वचषकाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात परफॉर्मन्स करणार आहे. ३० सप्टेंबरला भारत-श्रीलंका यांच्यात विश्वचषकाची पहिली लढ़त होईल. भारतात १२ वर्षांनी महिलांच्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. 'ब्रिग इट होम' नावाचे खास गाणे यावेळी भारतीय संघाला उद्देशून सादर करण्यात येईल. त्याशिवाय बीसीसीआयचे पदाधिकारी, आयसीसीचे पदाधिकारी व भारताचे माजी क्रिकेटपटू यावेळी हजेरी लावतील. २ नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्वत विश्वातील ८ संघ सहभागी होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
भारताचे सामने
३० सप्टेंबर वि. सीलंका
ऑक्टोबर दि. पाकिस्तान
९ ऑक्टोबर वि, दक्षिण आफ्रिका
१२ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया
१९ ऑक्टोबर दि. इंग्लंड
२३ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड
२६ ऑक्टोबर वि. बांगलादेश
यास्तिका दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार
पष्टिरक्षक तसेच डावखुरी सलामीवीर यास्तिका भाटिया गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसह एकदिवसीय विश्वचषकाला मुकणार आहे. तिच्या जागी उमा छेत्रीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघ १४ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुल्लानपूर येथे ऑस्ट्रेलिया संधाशी ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषकाच्या सराव सामन्यांसाठी भारतीय संघ गुवाहाटीला दाखल होईल. ३० सप्टेंबरपासून विश्वचषक सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी विशाखापट्टमाग येथे झालेल्या सराव शिबिरात यस्तिकाला दुखापत झाल्याने तिला नाइलाजास्तव स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
दरम्यान, २३ वर्षीय उमाने यापूर्वी ७ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधिय केले आहे. मात्र तिला एकाही एकदिवसीय सामन्याचा अनुभव नाही. ती राखीव खेळाडूत होती. रिचा घोष प्रथम पसंतीची वष्टिरक्षक असून पयांची यष्टिरक्षक म्हणून आता वास्तिकाऐवजी उमाचा संधात समावेश करण्यात आला आहे.