ठाणे महापालिकेला १०२.४ कोटींचा दंड; हरित लवादाचा दणका

ठाणे महापालिकेला तब्बल १०२.४ कोटी नुकसानभरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे.
ठाणे महापालिकेला १०२.४ कोटींचा दंड; हरित लवादाचा दणका
Published on

ठाणे : देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी ठाणे महापालिकेला तब्बल १०२.४ कोटी नुकसानभरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे.

मुंब्र्यातील सामाजिक कार्यकर्ते आरिफ इराकी यांनी यासंदर्भात हरित लवादाकडे दाद मागितली होती. नुकतीच यासंदर्भात सुनावणी झाली असून या सुनावणीमध्ये हरित लवादाने हे आदेश दिले आहेत.

इराकी यांनी उल्हास नदी आणि देसाई खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे गंभीर जलप्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांबाबत हरित लवादाकडे अर्ज केला होता. ठाणे पालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंब्रा येथे दररोज ३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी तयार होते, त्यापैकी ३० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान, खासगी संकुलातील १० लहान सांडपाणी प्रक्रिया केंद्रांद्वारे १.५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in