बदलापूर-वांगणी रस्ता मृत्यूचा सापळा? सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बदलापूर-वांगणी रस्त्यावर कासगाव येथील रस्त्यालगत असलेल्या मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बदलापूर-वांगणी रस्ता मृत्यूचा सापळा? सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
बदलापूर-वांगणी रस्ता मृत्यूचा सापळा? सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
Published on

बदलापूर : बदलापूर-वांगणी रस्त्यावर कासगाव येथील रस्त्यालगत असलेल्या मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नाल्याजवळ संरक्षक भिंत उभारण्याची किंवा लोखंडी रेलिंग बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्य महामार्ग ७६ चा भाग असलेल्या बदलापूर कर्जत रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची येजा सुरू असते. बदलापूरहून वांगणी, नेरळ, कर्जत, माथेरान व पुण्याला जाण्यासाठी बदलापूर परिसरातील बहुतांश लोक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे हा रस्ता सुस्थितीत असणे व या रस्त्यावर संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे. गेले अनेक महिने खड्ड्यांमुळे या रस्त्याची कासगाव ते गोरेगाव दरम्यान दुरावस्था झाली होती.

बदलापूर-वांगणी रस्ता मृत्यूचा सापळा? सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल

स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा रस्ता खड्डेमुक्त झाला. त्यामुळे ही गैरसोय टळली आहे. मात्र याच रस्त्यावर कासगाव येथे स्फुर्ती फार्म्सच्या शेजारी असलेल्या मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत वा रेलिंग नसल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता बळावण्याची भीती कासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश टेंबे यांनी व्यक्त केली आहे.

कासगाव वांगणी रस्त्यावर तीन ठिकाणी असलेले नाले दुथडी भरून वाहतात. त्यातील इतर दोन ठिकाणी नाल्याजवळ लोखंडी रेलिंग वा संरक्षक कठडे बसवले. मात्र स्फूर्ती फॉर्म शेजारच्या रस्त्यावर असलेला जुना कठडा अर्धा फूटाचा आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे चालकाचा अंदाज चुकून एखादे वाहन या कठड्याला धडकल्यास थेट नाल्यातील पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in