Thane : बॅडमिंटन हॉल विस्तार वादाच्या भोवऱ्यात; ४४ कोटींचा खर्च ५५ कोटींवर

ठाणे मनपाच्या महासभेत दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाच्या वाढीव खर्चावरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Thane : बॅडमिंटन हॉल विस्तार वादाच्या भोवऱ्यात; ४४ कोटींचा खर्च ५५ कोटींवर
Thane : बॅडमिंटन हॉल विस्तार वादाच्या भोवऱ्यात; ४४ कोटींचा खर्च ५५ कोटींवर
Published on

ठाणे : ठाणे मनपाच्या महासभेत दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाच्या वाढीव खर्चावरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुमारे ४४.४५ कोटी रुपयांत मंजूर झालेले हे काम आता ५५.५२ कोटी रुपयांवर पोहोचले असून, अतिरिक्त ११.०७ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.

बाजारभावानुसार प्रति चौरस फुट नवीन कामासाठी ५ हजार रुपये दर असताना या बॅडमिंटन हॉलच्या नूतनीकरणासाठी प्रती चौरसफूट ९ हजार रुपये दर आकारल्याचा दावा भाजपने केला आहे. या वाढीव खर्चात नवीन वास्तु बांधून तयार होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी सुरुवातीला ४१.६४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता होती. त्यानंतर मे. शेठ कन्स्ट्रक्शन कंपनीला ७.२० टक्के वाढीव दराने ४४.४५ कोटी रुपयांचे काम दिले. काम सुरू झाल्यानंतर या इमारतीची मजबुती अपुरी असल्याचा अहवाल समोर आला आणि संपूर्ण आराखडाच बदलावा लागल्याचे प्रशासनाने सांगितले.

Thane : बॅडमिंटन हॉल विस्तार वादाच्या भोवऱ्यात; ४४ कोटींचा खर्च ५५ कोटींवर
Mumbai : आरोग्य सेवेतील खासगीकरणाचा हट्ट कायम; पालिका रुग्णालयांतील सफाईसाठी १०१ कोटींचे कंत्राट

मूळ आराखड्यात जुन्या कॉलमवरच अतिरिक्त मजले उभारण्याचे नियोजन होते. परंतु स्थापत्य अहवालात ही इमारत अतिरिक्त भार सहन करण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाहेरील बाजूस स्वतंत्र पाईल फाऊंडेशन, नवीन कॉलम आणि लोखंडी फ्रेमवर्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्र ३३६६ चौ.मी. वरून थेट ५९८२ चौ.मी.पर्यंत वाढले. परिणामी प्रकल्पाचा खर्चही कोट्यवधींनी फुगला आहे.

वाढीव खर्च टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक सुविधा रद्द केल्याचे समोर आले आहे. ध्वनी प्रतिबंधक उपाययोजना यांसारख्या अनेक बाबी सध्या अत्यावश्यक नाहीत असे सांगत सुधारीत अंदाजपत्रकातून वगळल्या आहेत. तरीही खर्च ५५.५२ कोटींवर पोहोचला आहे. यामध्ये ४७ अतिरिक्त कामांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी तब्बल २०.०३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून मिळालेला निधी अपुरा पडत असल्याने आणखी ११.०८ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करावी लागणार आहे.

एकाच कंत्राटदाराला काम देणे अयोग्य

दरम्यान, दोनदा निविदा प्रक्रिया राबवूनही एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे एकाच ठेकेदाराला पुन्हा वाढीव खर्चासह काम देण्याच्या निर्णयावरही सवाल उपस्थित होत आहेत. त्यातही नुकत्याच झालेल्या महासभेत हा विषय दोनदा घेण्यात आला आहे. ३५ ( अ) आणि ७२(ब) नुसार मंजुर करण्यात आला आहे. कामाला विरोध नसून चुकीच्या पध्दतीला विरोध असल्याचे मत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in