डोंबिवलीत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

लोकलमधून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
डोंबिवलीत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू
डोंबिवलीत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

डोंबिवली : लोकलमधून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान शुक्रवारी सकाळी रेल्वे रुळांदरम्यान डोक्याला दुखापत झालेला मद्यपी आढळल्याने मध्य रेल्वेची लोकल सुमारे १५ मिनिटे रोखून धरण्यात आली. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ३० वर्षे असून, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला मदत केली.

डोंबिवलीत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू
दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ८.३५ वाजता विक्रोळी आणि घाटकोपरदरम्यान अप थ्रू मार्गावर ही घटना निदर्शनास आली. पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गादरम्यान ही व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली आढळली.

ही व्यक्ती लोकल धावणाऱ्या रुळांवर नव्हे, तर पाचव्या आणि सहाव्या मार्गांदरम्यान आढळली होती. लोकलच्या ट्रेन मॅनेजरने जखमी व्यक्तीला मदत केली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला घाटकोपर येथील उपस्थानक व्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in