बोगस नर्सिंग संस्थेकडून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक; पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाकडे नोंदणीच नाही, मंत्रालयात खुलासा

शहापूर बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कल्पना नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट या नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाची मान्यता नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
बोगस नर्सिंग संस्थेकडून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक; पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाकडे नोंदणीच नाही, मंत्रालयात खुलासा
बोगस नर्सिंग संस्थेकडून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक; पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाकडे नोंदणीच नाही, मंत्रालयात खुलासा
Published on

ओंकार पातकर/शहापूर

शहापूर बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कल्पना नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट या नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाची मान्यता नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मंडळाच्या प्रबंधकांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त, मुंबई यांना लेखी पत्र देत संबंधित संस्थेची नोंदणीच नसल्याचा खुलासा केला आहे.

विशेष म्हणजे, संस्थेतील विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. विद्यार्थी महेश गोडे व इतरांनी महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संस्थेमधील गंभीर त्रुटी आणि गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला.

तक्रारीत प्रवेशावेळी खोटी माहिती देऊन संपूर्ण फी वसूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, शहापूर येथे प्रवेश दाखवून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दुसऱ्या महाविद्यालयात नेण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. प्रॅक्टिकलच्या नावाखाली विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयांमध्ये १२-१२ तास ड्युटी लावण्यात येत असून, त्यांचे मानधन संस्थेकडूनच ठेवून घेतले जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष विनोद थोरात, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रवींद्र मराडे, कृष्णकुमार ठोंबरे आणि हरि हंबीर यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली.

बोगस नर्सिंग संस्थेकडून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक; पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाकडे नोंदणीच नाही, मंत्रालयात खुलासा
अपंगत्वाचा खोटा दावा, आठ शिक्षक निलंबित

यानंतर आदिवासी सामाजिक शैक्षणिक संस्था संचालित कल्पना नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, गोठेघर यांच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शहापूर पोलिसांनी याबाबत शिक्षण मंडळाकडे चौकशी केली असता, ७ एप्रिल रोजी मंडळाच्या प्रबंधकांनी आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभाग, शहापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि तक्रारदार विद्यार्थ्यांना लेखी पत्राद्वारे ही संस्था मंडळाशी संलग्न नसल्याचे स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in