

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ढोकाळी येथील श्री नंदीबाबा मंदिरात मोठी गर्दी होणार असल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष अधिसूचना जाहीर केली आहे. श्री नंदीबाबा मित्र मंडळामार्फत १५ फेब्रुवारी २०२६ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाशिवरात्रीचा उत्सव कापुरबावडी ट्रॅफिक उपविभागाच्या हद्दीत होणार आहे.
गर्दीमुळे वाहतूक बदल
ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, या काळात मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असून परिसरात वाहतूक कोंडीची स्थिती उद्भवू नये, यासाठी विविध मार्गांवर तात्पुरते निर्बंध व पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित आदेश ठाणे शहर वाहतूकचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार जारी केले आहेत.
प्रमुख मार्गांवरील निर्बंध
माजीवडा-मानपाडा प्रभाग → कोलशेत प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : कापुरबावडी सर्कल → तत्त्वज्ञान विद्यापीठ रस्ता → ब्रह्मांड / आर मॉल
कोलशेत → कापुरबावडी सर्कल / माजीवडा-मानपाडा ढोकाळी सिग्नल येथे प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : मनोरमा नगर / लोढा बिझनेस डिस्ट्रिक्ट → ब्रह्मांड
घोडबंदर-ठाणे मुख्य मार्ग → नौपाडा सिग्नल / डी-मार्ट जंक्शन → कोलशेत
आर मॉल येथे वाहने थांबवली जातील.
पर्यायी मार्ग : → मनोरमा नगरमार्गे सरळ पुढे→ ढोकाळी सिग्नल येथे डावीकडे → इच्छित स्थळी
आर मॉल सर्व्हिस रोड / हॉटेल विहंग इन → कोलशेत आर मॉल येथे प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : → मनोरमा नगरमार्गे सरळ पुढे→ ढोकाळी सिग्नल येथे डावीकडे → इच्छित स्थळी
कधीपासून निर्बंध?
• १५ ते १९ फेब्रुवारी २०२६
• दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत निर्बंध लागू
आपत्कालीन सेवांना सूट
पोलिसवाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांना या निर्बंधांत सूट देण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमुळे महाशिवरात्री उत्सव काळात भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन व्यवस्था मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.