कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार

उल्हासनगर येथे राहणारे भरत टोपले शुक्रवारी पहाटे कसारा लोकलने प्रवास करत होते. यावेळी डब्यातील तीन तरुण बिडी ओढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार
कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये किरकोळ कारणांवरून होणारे वाद, मारहाण आणि हल्ल्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच शुक्रवारी (दि. २७) पहाटे कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. डब्यात बिडी ओढण्यास विरोध केल्याने तिघांनी कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान एका प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला केला. लगेज डब्यातील या हल्ल्यात प्रवाशाच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पसार झाले असून, रेल्वे पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार
Mumbai : दरवाजात उभं राहण्यावरून वाद अन् हाणामारी! चर्चगेट-विरार लोकलमधून प्रवासी थेट फलाटावर पडला, Video

नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथे राहणारे भरत टोपले शुक्रवारी पहाटे कसारा लोकलने प्रवास करत होते. यावेळी लगेज डब्यातील तीन तरुण बिडी ओढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डब्यात इतर प्रवासीही असल्याने त्यांनी संबंधित तरुणांना बिडी ओढण्यास मनाई केली. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने तिघांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

काही वेळातच या वादाचे हिंसक रूपांतर झाले. लोकल कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान असताना तिघांपैकी एकाने धारदार शस्त्राने भरत यांच्या डोळ्याजवळ वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याच्या आसपास गंभीर दुखापत झाली. सुदैवाने त्यांचा डोळा थोडक्यात बचावला.

हल्ल्यानंतर तिघेही फरार, पोलिसांकडून शोध सुरू

हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी लोकलमधून पसार झाले. जखमी अवस्थेत असतानाही भरत टोपले यांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच सहप्रवाशांशी संवाद साधून घटनेबाबत माहिती घेण्याचाही प्रयत्न केला.

कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार
Mumbai : विरार-चर्चगेट लोकलमध्ये राडा; दोन प्रवाशांच्या भांडणात भिरकावलेला चाकू लागून भलताच प्रवासी जखमी, आरोपी अटकेत

दरम्यान, या प्रकरणी भरत टोपले यांनी लोहमार्ग पोलिसांकडे (GRP) ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. धावत्या लोकलमध्ये केवळ धूम्रपानाला विरोध केल्यामुळे प्रवाशावर हल्ला होण्याच्या या घटनेने लोकल प्रवासातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)