दिवाळीआधी ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथकरांसाठी आनंदाची बातमी; मेट्रोचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल!

वर्षानुवर्षे वाहतूककोंडीचा सामना करणाऱ्या कल्याण-उल्हासनगरकरांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी आली आहे. मेट्रो ५ आणि ५-अच्या विस्तारित मार्गिकांसाठी तब्बल ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे...
दिवाळीआधी ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथकरांसाठी आनंदाची बातमी; मेट्रोचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल!
दिवाळीआधी ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथकरांसाठी आनंदाची बातमी; मेट्रोचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल!संग्रहित छायाचित्र
Published on: 

उल्हासनगर : वर्षानुवर्षे वाहतूककोंडीचा सामना करणाऱ्या कल्याण-उल्हासनगरकरांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी आली आहे. मेट्रो ५ आणि ५-अच्या विस्तारित मार्गिकांसाठी तब्बल ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावण्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळाले असून, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पाच शहरांच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका ५ आणि ५-अच्या पुढील टप्प्यांसाठी या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पातील विशेष बाब म्हणजे रांजणोली ते दुर्गाडी परिसरात मेट्रो आणि उड्डाणपुलाची डबल डेकर मार्गिका उभारण्यात येणार आहे. तसेच जगदीश दूध डेपो परिसरापासून उल्हासनगरपर्यंत डबल डेकर मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे.

भुयारी आणि उन्नत मार्गिकेचा समावेश

मेट्रो ५च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गाचे काम सुरू आहे. पुढील टप्प्यात धामणकर नाका ते रांजणोली आणि दुर्गाडीमार्गे भोईरवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.मेट्रो ५-अ अंतर्गत भोईरवाडी ते कल्याण रेल्वे स्थानक आणि पुढे उल्हासनगरमार्गे अंबरनाथ येथील जीएनपी गॅलेक्सीपर्यंत मेट्रोचा विस्तार प्रस्तावित आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रवाशांना मेट्रोच्या माध्यमातून जोडणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)