भाईंंदर : आई, दोन मुलांनी केला वडिलांचा खून; नवघर पोलिसांकडून अटक

भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १९ नोव्हेंबर रोजी ५१ वर्षीय सुशांतो अबोनी पाल याचा खून करण्यात आला होता. सुरुवातीला हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात नोंदवण्यात आला होता.
भाईंंदर : आई, दोन मुलांनी केला वडिलांचा खून; नवघर पोलिसांकडून अटक
Published on

भाईंंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १९ नोव्हेंबर रोजी ५१ वर्षीय सुशांतो अबोनी पाल याचा खून करण्यात आला होता. सुरुवातीला हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात नोंदवण्यात आला होता. मात्र गुप्त माहिती, तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुशांतो यांचा खून त्यांचीच पत्नी आणि दोघा मुलांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पत्नी अमृता व मुलगा सुमित पाल यांना अटक करण्यात आली असून दुसरा मुलगा अनित पाल विधिसंघर्षग्रस्त असल्याने त्याला बालकोठडीत ठेवण्यात येणार आहे.

१९ नोव्हेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास सुशांतो पाल यांच्यावर धारदार आणि टणक हत्याराने डोक्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. घटनेची तक्रार मित्राने पोलिसांकडे दिली. त्यानुसार नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान अमृता पाल आणि तिची मुले पैशांच्या कारणावरून वारंवार भांडण करत असल्याचे समोर आले. त्यानुसार पत्नी आणि मुलांभोवती केंद्रित करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in