कारवाईत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्याविरोधात गुन्हा

कर्मचाऱ्यांकडून याबाबत फेरीवाल्यांना मनमानी कारभार न करण्याची सूचना देण्यात आली होती.
कारवाईत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्याविरोधात गुन्हा

डोंबिवली : स्टेशनबाहेरील परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्याविरोधात पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाच्या फिर्यादीवरून अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील रामनगर येथे पालिकेचे फेरीवाला पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, विलास साळवी आणि सुनील सुर्वे यांसह कर्मचारीवर्ग फेरीवाल्यांवर कारवाई करत होते. कारवाई दरम्यान फेरीवाला संतोष चिरंजीवीलाल अग्रवालने विरोध केला. कर्मचाऱ्यांकडून याबाबत फेरीवाल्यांना मनमानी कारभार न करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र फेरीवाल्यांनी पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने फेरीवाल्यांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in