पूर्णेकर हत्या प्रकरण : पप्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी

ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सतीश उर्फ पप्या शिंदे याला सोमवारी ठाणे न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पूर्णेकर हत्या प्रकरण : पप्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी
पूर्णेकर हत्या प्रकरण : पप्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी
Published on: 

ठाणे : ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सतीश उर्फ पप्या शिंदे याला सोमवारी ठाणे न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

२९ सप्टेंबरला रात्री पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी सतीश उर्फ पप्या शिंदे याला अटक केली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी त्याला न्यायाधीश एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

पूर्णेकर हत्या प्रकरण : पप्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी
Thane : पूर्णेकरची हत्या, मित्राला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा, अन्य आरोपींचा शोध सुरू

पप्या शिंदे याने मारेकऱ्यांना घटनास्थळावरून पसार होण्यासाठी कारची व्यवस्था केल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच त्याने वापरलेला मोबाईल क्रमांक दुसऱ्याच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in