फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले

शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडला.
फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले
Published on

ठाणे : शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडला. याविरोधात पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. शाळेची महिन्याची फी भरली नाही म्हणून आणि काही पालकांनी ऑनलाईन फी भरून सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, पालकांनी शाळा प्रशासनाकडून सुरू असलेल्या पिळवणुकीविरोधात संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

विद्यार्थी मराठीत बोलले तर ५० रुपये दंड!

"आम्ही दर महिना फी भरतो, पण कधी तरी उशीर होतो, त्यातही शाळा प्रशासनाकडून दंड आकारला जातो, ऑनलाईन फी भरलेली शाळेला मान्य नाही, शाळेत जर विद्यार्थी मराठीत बोलले तरी ५० रुपये दंड, मुलींनी शाळेत टिकली लावली तरी ५० रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना फी भरण्यास उशीर झाला, तर तुमची या शाळेत शिकण्याची लायकी नाही, तुम्ही मराठी शाळेत शिका, अशी भाषा शाळेच्या शिक्षकांकडून आणि मुख्याध्यापकांकडून वापरली जात असल्याचा आरोप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in