Thane : दिवा स्थानकात गर्डर उभारणीसाठी विशेष ब्लॉक; काही लोकल सेवा रद्द, मेल-एक्स्प्रेस गाड्याही उशिराने धावणार

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाच्या दक्षिण (सीएसएमटी) तसेच उत्तर (कल्याण) टोकावरील नव्या पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शुक्रवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
Thane : दिवा स्थानकात गर्डर उभारणीसाठी विशेष ब्लॉक; काही लोकल सेवा रद्द, मेल-एक्स्प्रेस गाड्याही उशिराने धावणार
Thane : दिवा स्थानकात गर्डर उभारणीसाठी विशेष ब्लॉक; काही लोकल सेवा रद्द, मेल-एक्स्प्रेस गाड्याही उशिराने धावणार
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाच्या दक्षिण (सीएसएमटी) तसेच उत्तर (कल्याण) टोकावरील नव्या पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शुक्रवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक मध्यरात्री १२.१० ते पहाटे ४.१० या वेळेत घेतला आहे. त्यामुळे काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांवर याचा परिणाम होणार आहे.

ब्लाॅकदरम्यान ठाणे-डोंबिवली अप आणि डाऊन जलद मार्गिका, पाचवी व सहावी मार्गिका, तसेच दिवा-निलजे दरम्यानची दिवा- पनवेल-रोहा मार्गिका प्रभावित होईल. शुक्रवारी रात्री ३.४३ वाजता अंबरनाथहून सुटणारी अंबरनाथ-सीएसएमटी लोकल, पहाटे ५.१६ वाजता सीएसएमटीहून सुटणारी सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रद्द करण्यात आली आहे, तर कल्याण-ठाणे विभागातील अप जलद मार्गिका आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल व एक्स्प्रेस गाड्या अप धीम्या मार्गिकेवर वळविण्यात येतील.

Thane : दिवा स्थानकात गर्डर उभारणीसाठी विशेष ब्लॉक; काही लोकल सेवा रद्द, मेल-एक्स्प्रेस गाड्याही उशिराने धावणार
पुणे-मिरज रेल्वे मार्गावर २१ दिवसांचा मेगाब्लॉक; दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

गाडी क्रमांक ११००३ दादर- सावंतवाडी रोड रेल्वेगाडी शुक्रवारी मध्यरात्री १२.०५ वाजता सुटण्याऐवजी पहाटे ४ वाजता सुटेल. गाडी क्रमांक १२१४१ एलटीटी-पाटलीपुत्र अतिजलद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर अतिजलद एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२५३८ एलटीटी-गोरखपूर कुशीनगर अतिजलद एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील या रेल्वेगाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. तसेच, गोरखपूर-दादर विशेष रेल्वेगाडी, गाडी क्रमांक १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, या रेल्वेगाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गिकेवर वळविण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in